Creation Science Information & Links!
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात
The Christian Gospel Message · in Marathi

   "शास्त्रात असे लिहिले आहे: “पापाशिवाय असा कोणीही नाही. एकही नाही."   Romans 3:10

   "सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत."   Romans 3:23

   "कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे."   Romans 6:23

   "परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो."   Romans 5:8

   "होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे."   योहान (John) 3:16

   "जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो."   I John 1:9

   "की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंत:करणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल  कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंत:करणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो."   Romans 10:9-10

   "काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला."   योहान (John) 1:12

   "येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते."   योहान (John)n 14:6

   "पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो."   योहान (John) 5:21

   "कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नही, तर ते देवापासूनचे दान असे आहे.  आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये."   Ephesians 2:8-9

   "आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात.    कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे.  व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले."   I Corinthians 15:1,3-4

   "म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते."   याकोब (James) 5:16

   "प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण  जो प्रीति करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे."   I John 4:7-8

   "यासाठी, प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वत:चे रक्षण करा. यासाठी की, नियमशास्त्रविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अढळ भूमिका आहे, तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून संभाळा.  परंतु आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंतकाळपर्यंत गौरव असो."   2 पेत्र (II Peter) 3:17-18


देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात · मराठी
http://www.creationism.org/marathi/salvation_mr.htm



मुख्य:  Marathi
www.creationism.org